रविवार, ३१ डिसेंबर, २०२३

आभासी शांतता

 किती अवघड आहे मला समजून घेणं


काळया कातळातल्या शांत पाण्यासारख
शांततेत लपलेल्या सुरेल गाण्यासारख

दिसतच नाही वरवर काही
कुठल्या खुणा, स्पंदने ना तरंग
स्मृतीआड गेलेल्या रहस्यासारखं

सहज जाणवणाऱ्या भावनांहून वेगळंच
रोजच्या निकषांच्या पलीकडे
आपल्याच जगात वावरणार

कुठल्याश्या कपारीत लपलेलं
स्वतःच उभ्या केलेल्या एकटेपणाच्या भिंतीत
गुदमरलेलं

माझं मन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा