रविवार, ७ एप्रिल, २०१९

Will you be my Valentine? (मराठी)



प्रेमदिवस प्रेमदिवस वेगळ काही नसत 
धगधगत्या वास्तवावर फुँकर हलकी असत 
तेच जून वेड, पुन्हा नव्याने पेटत 
एकरूप मन परत स्वतःलाच भेटत 

दगदगीत रोजच्या पळत असत मन 
वैशाखाचा वणवा सरतो, सरतो ओला श्रावण 
प्रेम असतच तिथ दडून, पण ते ओसंडून दिसत 
आणि जगण्याच कारण परत एकदा कळत 

बघताच तुला फ़क्त, गोंधळ मानत दाटण 
हातात हात देताना, तुझ मणभर लाजण 
तेंव्हा जागात आपल्याशिवाय दूसर  कुणीच नसण
तय गुलाबी क्षणांची उजळणी असत 

असेल काहिंसाठी ही राजकारणाची पोळी 
किंवा काहींसाठी बाजारूपणाची बोली 
पण त्या दिवशी मि एक मात्र करिन 
उत्तर महित असूनही परत विचारिन 
Will you be my valentine?   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा