रविवार, ७ एप्रिल, २०१९

सुख सुख म्हणतात ते हेच आहे वाटत

सुख सुख म्हणतात ते हेच आहे वाटत 
फ़क्त बघूनच तुला प्रेम मनी दाटत 
चुकून माकुन डोळा आलच कधी पाणी 
तू तुझ्या पदरानी ते पुसून घ्याव वाटत 


सुख सुख म्हणतात ते हेच आहे वाटत 
पहाटे पानाफुलांवर देव जस साठत
नकळत तुझी स्वप्न, होऊन जातात माझी 
तळहातांच्या फोडासम त्यांना जपावस वाटत 

जुन्यापान्या गंजलेल्या लोखंडाचे जीणे
फ़क्त तुझे येणे, अन झाले त्याचे सोने 
तुझा दागिना व्हाव असा घडावस वाटत 
सुख सुख म्हणतात ते हेच आहे वाटत 

जास्त जाही नाही फ़क्त, सोबत तुझी लागते 
तू जवळ असण, तेवढ्यानेच भागते 
मनाही मग बुद्धिशी सबुरीन वागत 
सुख सुख म्हणतात ते हेच आहे वाटत 

पाझरतो नित्य प्रेमांचाच झरा
दुःखाला नहीं औषधाला थारा 
मग मृत्यु आला तरी, त्याला भेटावस वाटत 
सुख सुख म्हणतात ते हेच आहे वाटत 
सुख सुख म्हणतात ते हेच आहे वाटत 
      


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा