गुलाबी नशा, गुलाबी दिशा
आठवणी जाहल्या गुलाबी कश्या?
फूल गुलाबी, त्याचे काटे गुलाबी
आसमंती दरवळे गंध गुलाबी
उमटे मनावरी गुलाबी ठसा
अन्तरंगी मोहरे प्रीत गुलाबी
आस गुलाबी अन भास गुलाबी
रंग एकच भरला गुलाबी जसा
क्षणोक्षणी आठवे भेट गुलाबी
काळ सर्व व्यापतो विरह गुलाबी
गुलाबी उषा, गुलाबी निशा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा