पाप नको मज, पुण्य नको, पाप नको मज, पुण्य नको
कर्तुत्वाच्या अभिमानचा ताप, व्याप, संताप नको
मी अस्पृश्य, शूद्र बावळा, आईस माझ्या माझा कळवळा
तिच्या प्रेम बंधापासूनी मुक्तीचि छंद नको
सामान्य, अति सामान्य मी, जगतामध्ये उगाचच मी
मी तर फ़क्त बाळ आईचा, दूसरे मज अस्तित्व नको
नको भज मज, शंका, चिंता, अस्त्र मज शस्त्र नको
आई पदरी सूखे निद्रा, चित्त कुठे अन्यत्र नको
मार, ताड़, अव्हेरी तरी, रांगत यावे तिच्याकडे
ममतेचा हा ध्यास मिळावा, दूसरी कुठली आस नको
नको साधना, नको विरक्ति, नको ध्यान आणि नको ती भक्ती
नको धर्म आणि नकोच कर्मे, प्रेमावाचूनि काही नको
प्रेम सोसतो, प्रेम भोगतो, प्रेमानंदे प्रेम खेळतो
प्रेमभोवरे, प्रेमलहरी, प्रेमापरी अन्य काही नको
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा