हेलावूनी टाक मनाला,झन्झोडुनी टाक मनाला
असेच येवो पुनः पुन्हा वादळ प्रेमाचे तुझ्या
मरगळ सारी जाईल उडुनी, चैतन्याच्या नव्या चाहुली
जश्या कोरड्या ओंडाक्याला; चैत्राची नवी पालवी
जणू माळरानी बरसल्या, सरी प्रेमाच्या तुझ्या
नैरश्याचा फड़शा पाडूनी, आरास नवी स्वप्नांची मांडूनी
आकाशाच्या कृष्णपटावर, चांदण्यांची नक्षी काढूनी
शिशिरा मध्ये असा बहरला वसंत प्रेमाचा तुझ्या
ओळख पुन्हा शब्दांची झाली, पुन्हा व्यायलो कविता माझी
कागदावर येण्यासाठी भवानांना केले राजी
जन्माला पुन्हा कवि मनाचा, हि किमया प्रेमाची तुझ्या
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा