शुक्रवार, २३ ऑक्टोबर, २०१५

हि किमया प्रेमाची तुझ्या

हेलावूनी टाक  मनाला,झन्झोडुनी टाक मनाला 
असेच  येवो  पुनः पुन्हा वादळ प्रेमाचे तुझ्या  

मरगळ  सारी जाईल उडुनी, चैतन्याच्या नव्या चाहुली 
जश्या कोरड्या ओंडाक्याला; चैत्राची नवी पालवी 
जणू माळरानी बरसल्या, सरी प्रेमाच्या तुझ्या 

नैरश्याचा फड़शा पाडूनी, आरास नवी स्वप्नांची मांडूनी 
आकाशाच्या  कृष्णपटावर, चांदण्यांची नक्षी काढूनी 
शिशिरा मध्ये असा बहरला वसंत प्रेमाचा तुझ्या 

ओळख पुन्हा शब्दांची झाली, पुन्हा व्यायलो कविता माझी 
कागदावर येण्यासाठी भवानांना केले राजी 
जन्माला पुन्हा कवि मनाचा, हि किमया प्रेमाची तुझ्या 

गुलाबी

गुलाबी नशा, गुलाबी दिशा
आठवणी जाहल्या गुलाबी कश्या?

फूल गुलाबी, त्याचे काटे गुलाबी
आसमंती दरवळे गंध गुलाबी
उमटसे मनावरी गुलाबी ठसा

अंतरंगी मोहरे प्रीत गुलाबी
आस गुलाबी अन भास गुलाबी
रंग एकच भरला गुलाबी जसा.

क्षणोक्षणी आठवे भेट गुलाबी
काळ सर्व व्यापातो विरह गुलाबी
गुलाबी उषा गुलाबी निशा 

प्रेमापरी अन्य काही नको

पाप नको मज, पुण्य नको, पाप नको मज, पुण्य नको
कर्तुत्वाच्या अभिमानचा ताप, व्याप, संताप नको 

मी  अस्पृश्य, शूद्र बावळा, आईस माझ्या माझा कळवळा 
तिच्या  प्रेम बंधापासूनी मुक्तीचि छंद   नको    

सामान्य, अति सामान्य मी, जगतामध्ये उगाचच मी 
मी तर फ़क्त बाळ आईचा, दूसरे मज अस्तित्व नको  

नको भज मज, शंका, चिंता,  अस्त्र मज शस्त्र नको 
आई पदरी सूखे निद्रा, चित्त कुठे अन्यत्र नको 

मार, ताड़, अव्हेरी तरी, रांगत यावे तिच्याकडे 
ममतेचा हा ध्यास मिळावा, दूसरी कुठली आस नको 

नको साधना, नको विरक्ति, नको ध्यान आणि   नको ती भक्ती 
नको धर्म आणि नकोच कर्मे, प्रेमावाचूनि काही नको 

प्रेम सोसतो, प्रेम भोगतो, प्रेमानंदे प्रेम खेळतो 
प्रेमभोवरे, प्रेमलहरी, प्रेमापरी अन्य काही नको