गुरुवार 18 फेब्रुवारी 2010

शब्दसम्राट!

शब्दसम्राट! असा हा थाट, 
म्हणे मी कवी 
उघडतो मनाची दारे, वाचतो सारे, 
जे दडले उरी 

शब्दांशी खेळतो असे, सवंगडी जसे, 
बालपणीचे
अशक्यास शक्यही करतो, भाग्य बदलतो,  
रणीचे

कथन मी करतो कथा, मांडतो व्यथा, 
प्रेमात मनाच्या
कधी अंधाराचा खेळ, उरी घालमेल, 
कुणाच्या 

शब्दात मांडतो स्वप्ने, घडलेली न-घडलेली
अन क्षणात उमलवतो ओठांची कळी 
अळी-मीळी घट्ट मिटलेली

पण येते जेव्हा वेळ, व्यक्त करण्याची प्रेम 
तुजवरचे माझे 
बोचतात हृदयी काटे, मनावर दाटे
भावनांचे ओझे 

मी खानात होतो दीन, शब्दांवीन 
चाचपडतो       
घाबरतो मी, लड़खडतो
आणि तुझ्या मिठीत येऊन दडतो  

© Copyrights Reserved Avadhoot Kulkarni
जर ही कविता कुणाला पाठवायची असेल तर कृपया सोबत ह्या ब्लॉगची लिंक http://mazikalpana.blogspot.com/ सुद्धा पाठवावी ही विनंती.
 

1 टिप्पणी(ण्या):

  1. अनामितFeb 23, 2010 09:53 PM

    Hi Avadhoot,

    Chan kawita aahe!
    Good tu ya sathi vel devu shakatos.
    Bakichya navin kawita nahi vachalya ajun.

    -- Bharati

    प्रत्युत्तर द्याहटवा