एक कर्ण कर्क:श्य किंकाळी, कानाचे पडदे फाड़त
सरळ मेंदूत घुसली
आणि मी हरवली शुद्ध, जसा तपस्वी बुद्ध
नीरव शांततेत झोपलेला
तशी आवाजाची ओळख नाही मला
ठार बहिरा म्हणुनच जगलो,
म्हणतात तसाच होतो उपजलो
मग शिकलो,
शब्दांपलिकडे वाचायला
चहरे, भावना, विचारही, डोळ्यांनीच मोजायला
तशी आवाजाची उणीव नाही भासली
पण बहिरेपणाची जाणीव मात्र बोचली
कदाचीत डोक्टरांनी शपथ पूर्ण केली
आणि घडवून आणली माझी आवाजाशी भेट पहीली
बहुतेक तीच, कर्ण कर्क:श्य किंकाळी
परत एक गोंधळ चिवचिव चावचाव
डोळ्यात मुंग्यांच वारुळ की, मध माश्यांचा पोळ
त्यावर एक मोठा डोक्टरांचा आवाज
" अभिनन्दन! तुम्ही ऐकू शकता आता."
मी सहनशक्तीला ताण देता देता
चेहेर्यावर हसू आणत म्हणालो
"Thank you डॉक्टर!"
आणि मनात .. "हेच पटवून द्यायला की,
मी बहिराच जास्त सुखी होतो?"
© Copyrights Reserved Avadhoot Kulkarni
जर ही कविता कुणाला पाठवायची असेल तर कृपया सोबत ह्या ब्लॉगची लिंक http://mazikalpana.blogspot.com/ सुद्धा पाठवावी ही विनंती.
जर ही कविता कुणाला पाठवायची असेल तर कृपया सोबत ह्या ब्लॉगची लिंक http://mazikalpana.blogspot.com/ सुद्धा पाठवावी ही विनंती.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा