सोमवार, १६ जून, २०२५

पाठमोरी सावली

 
 
तळ्याकाठी खडकावरती वेळ थांबलेली
पाठमोरी तुझी जाताना सावली लांबलेली

उदास सूर्य मावळतीचा शांत सौम्य झाला
गंधभरीत थंड वारा फेर धरीत आला
गालावरची घेऊन लाली दिशा रंगलेली
तरी तुझी पाठमोरी सावली लांबलेली

मनी माझ्या दाटून आले मेघ गर्द काळे
मौनमध्ये विरूनही गेले प्रेमाचे उमाळे
डोळ्यांचीही लाडीक भाषा आज अडलेली
म्हणून तुझी पाठमोरी सावली लांबलेली

हरुनही द्वंद्व मनीचे जीत मीच झालो
झुगारून अहंगंड समर्पित झालो
पाण्यावरी फुलल्या लाटा वेळ मुक्त झाली
पाठमोरी जाताना आपली सावली सांधलेली
 
 
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा