गुरुवार, ३ जानेवारी, २०१९

जीवन कविता



काय पाहिजे मजला, मज कळतच नाही 
मार्ग दिसती असंख्य, ध्येय दिसतच नाही 

निवडूनी मार्ग एक, मी सुटलो सुसाट 
निश्चय मनी दॄढ, आणि जिद्द अफाट 
मार्ग हाच योग्य असा विश्वास वाटतच नाही 

झटकल्या शंका साऱ्या, विश्वास उभा केला 
पण पावलो-पावली त्याचा तोल डगमगाला 
स्थिर राहिल तो उभा, असा आधारच नाही 

टाकले यत्न सर्व आणि कर्तृत्वाभिमान
सर्व विचार मारिले, झालो दैवाचे स्वाधीन 
आता तोची एक मार्ग, आणि तेचि एक ध्येय

आता नाही मज ध्येय, नाही आशा नाही आस
नाही झुरणे कसले, नाही कसलाही ध्यास

तुझ्या प्रेमाचाहा हा खेळ, तूच खेळ खेळविता
तुझ्या शब्दांनी रचली माझी जीवन कविता