तू असतेस बरोबर तेंव्हाही, मी वेगळा काही नसतो
ना गातो,ना नाचतो, ना हवेमधे उडतो
तू नसतानाही मी, चलते, बोलतो तसाच
पण आत कुठेतरी, मी मीच नसतो...
असही नाही की कुठे, एकटक बघत बसतो
काम धाम सर्व टाकून, एकटाच कुढत बसतो
मी करतो सगळा तसच, जस करतो तू असताना
तू नसताना फक्त सगळ्यात तुलाच शोधत बसतो ...
असही नाही की डोळ्यात अश्रु होतात गोळा
असाही नाही की हृदयाचा होतो चोळामोळा
खरतर होठांवरती असते तसेच हसु
पण नसताना तू , त्यामागचा भाव खोटा असतोो...