मंगळवार, ३ एप्रिल, २०१२

एप्रिल FOOL

एक कोंबडा थोडा Dizzy,
Dizzy नाही तर, पक्का Crazy
भर रात्री बारा वाजता
जोरात म्हणाला"कु-कुडूक-कू"SSS

गटारात मग जागा झाला,
मदिराधीन निद्रिस्त दारूडा
दुसरा दिवस उगवला समजूनी
गुत्त्याकडे चालू लागला

झाडावरची चिमणी जोडी
गोंधळून ती गेली पुरती
जर सकाळझाली तर मग
अंधार का खालती, वरती?

एक आंधळा गरीब भिकारी
ऐकुनी उठला ती आरोळी
भिकेच्या अपेक्षेने मग
गाऊ लागला तो भूपाळी

मालक सुद्धा जागा झाला
आणि घड्याळपाहूनी हसला
१ एप्रिलच्या अश्या पहाटे
असेल का कुणी या कोंबड्याला फसला?

© Copyrights Reserved Avadhoot Kulkarni
जर ही कविता कुणाला पाठवायची असेल तर कृपया सोबत ह्या ब्लॉगची लिंक 
http://mazikalpana.blogspot.com/ सुद्धा पाठवावी ही विनंती.